पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर पवाराची औलाद सांगणार नाही: अजित पवार

अजित पवार

दसऱ्याचे औचित्यसाधत सर्वच पक्षांनी मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर येथून प्रचाराला सुरुवात केली. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील आघाडीचे उमेदावार उत्तम जानकर यांची प्रचार सभा झाली. या प्रचारसभेचा नारळ अजित पवार यांनी फोडला. 'आमच्या हाती सत्ता दिल्यास तीन महिन्यात सात बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही', असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

'शरद पवारांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार'

दरम्यान, अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. भाजपच्या नेत्यांना शेतीचे काही कळत नाही. पीकांवर कोणता रोग जडला याची त्यांना काहीच कल्पना नसते. ते तुमचे प्रश्न कसे काय सोडवणार? त्यांना तेल्याही कळत नाही आणि लाल्याही कळत नाही.', असा टोला लगावत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. 

पीबल्स, मेयर आणि क्वेलोज यांना यंदाचा भौतिक शास्त्राचा नोबेल

'आम्ही बोलतो ते करतो. वचनपूर्तीचे राजकारण करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. या सरकारने तुम्हाला फक्त  कर्जमाफी करतो असे सांगितले. हे सरकार शेतकऱ्याला पीक विम्याचा पैसा देत नाही. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला पिकांवर रोग कुठला असतो हेत कळत नाही. तर मदत कशी करणार' असा टीका अजित पवारांनी लगावला आहे. 

काँग्रेस निवडणूक जिंकण्याची शक्यता कमीच, सलमान खुर्शीद