पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल; पवार कुटुंबियांमध्ये चर्चा सुरु

अजित पवार आणि शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राजीनामा दिल्यानंतर तब्बल २० तास अजित पवार यांचा फोन बंद लागत होता. ते कुठे गेले होते याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती. सध्या ते पवाराच्या निवासस्थानी पोहचले आहेत. सिल्व्हर ओकवर सध्या पवार कुटुंबियांमध्येच चर्चा सुरु आहे. 

'खांदेरी' नौदलाच्या ताफ्यात दाखल; ही आहेत खास वैशिष्ट्ये

आमदारकीचा राजीनामा दिल्यापासून अजित पवार कुठे होते हे कोणाला नाहिती नव्हते. तब्बल १९ तासांपासून त्यांचा फोन बंद लागत आहे. रात्री उशिरा अजित पवार अहमदनगर येथील अंबालिका कारखान्यावर गेले होते. त्यानंतर ते मुंबईत असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, शरद पवार पुण्यावरुन मुंबईत आल्यानंतर अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. 

काँग्रेसच्या तिकीट वाटपामध्ये राहुल गांधी लक्ष घालणार नाहीत

पवारांच्या निवासस्थानावर फक्त पवार कुटुंबियांमध्येच चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत मात्र ते बाहेर उभे आहेत. सिल्व्हर ओकवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे भाऊ श्रीनिववास  पवार यांच्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकी दरम्यान नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

'राजीनामा दिला तरी अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही'