पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परळीतून धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

गुरुवारी सकाळी धनंजय मुंडे यांनी परळी येथे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले

परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडेंनी गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला. 

आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेनेचे मोठे शक्तिप्रदर्शन

गुरुवारी सकाळी धनंजय मुंडे यांनी परळी येथे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले, त्यानंतर जन्मगाव नाथरा येथे ग्रामदैवताचे दर्शन व गावातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथगड येथील समाथीस्थळी तसेच वडील दिवंगत पंडीतअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी दर्शन घेतले. नाथरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासही त्यांनी अभिवादन केले तहसिल कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्जाचे चार संच दाखल केले. 

सर्वांच्या आशीर्वादाने जिंकू
मतदारसंघातील प्रत्येक समाज घटकाचा आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे, या आशीर्वादाच्या बळावर आपण विकासाची ही लढाई लढत असून, त्यात आपल्याला नक्की यश मिळेल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.