पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकरी उगीच आत्महत्या करत नाहीत, शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

शरद पवार

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात सरसकट कर्जमाफी झालीच नाही. २१ टक्के लोकांना कर्जमाफी मिळाली. ७९ टक्के लोकांना कर्जमाफी मिळालीच नाही, असे सांगत शेतकरी उगीच आत्महत्या करीत नाहीत, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले. अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी राज्यातील युती सरकारवर टीका केली. राज्यात परिवर्तन होण्याची स्थिती आहे, असेही भाकीत त्यांनी यावेळी केले. 

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख विसरलाय, राधाकृष्ण विखेंची टीका

शरद पवार म्हणाले, कष्ट करणाऱ्याला त्याच्या घामाची किंमत मिळालीच पाहिजे. यासाठी मी कायम आग्रही राहिलो होतो. मी केंद्रात सत्तेवर असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून भाजपच्या खासदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत आंदोलन केले. पण मी त्यांच्या आंदोलनामुळे कांद्याच्या भाव पडू दिले नाही. कारण काळ्या आईशी इमान राखून अहोरात्र कष्ट करणाऱ्याला त्याच्या हक्काचा पैसा मिळाला पाहिजे. शेतीमालाचा भाव वाढला पाहिजे, यासाठी आम्ही कायम आग्रहीच राहिलो. पण आता या शेतकरीविरोधी सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. 

एसबीआयकडून ग्राहकांना दिवाळी भेट; सहाव्यांदा व्याज दरात कपात

काँग्रेस सरकारच्या काळात साखर कारखाने आणि इतर कारखाने सुरू झाले. पण युती सरकारच्या काळात कारखाने बंद पडू लागले आहेत. मुंबई, हिंगणघाट, अकोला, नागपूर येथील कापड गिरण्या बंद पडल्या आहेत, असाही आरोप त्यांनी केला.