पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले की...

सोनिया गांधी आणि शरद पवार

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने चांगले यश मिळवले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील वेगळ्या समीकरणासंदर्भात चर्चा अपेक्षित होती. मात्र, यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एकदा सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

'हेरगिरी प्रकरणी दोषी असेल तर केंद्र सरकारने सत्तेपासून दूर व्हावे'

सोनिया गांधी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तास्थापनेसंदर्भातील भूमिका काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. पवार म्हणाले की, सत्तास्थापनेसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. जनतेने ज्यांना बहुमत दिले आहे. त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापन करणे अपेक्षित आहे. भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद हे टोकाचे असल्याचे वाटते, असेही पवार यावेळी म्हणाले. शिवसेनेकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.  

याआधी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांची जनपथवरील सोनिया गांधींच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. यावेळी राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आले होते. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील चर्चेदरम्यान राज्यातील परिस्थितीवर कोणती भूमिका घेणार याबाबतचे चित्र स्पष्ट होणार का?  याकडे राज्याचे लक्ष होते. मात्र या भेटीत पूर्णपणे चित्र समोर आलेले नाही. 

सरकार स्थापनेमध्ये शिवसेना अडथळा नाही: संजय राऊत