पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सदसदविवेकबुद्धीला स्मरून मतदार मतदान करतील हा विश्वास - शरद पवार

शरद पवार यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. (फोटो - भूषण कोयंदे)

मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन करून राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मतदार नक्कीच सदसदविवेकबुद्धीला स्मरून मतदान करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

राज्यात पुन्हा एकदा युतीचेच सरकार येईल, नितीन गडकरींना विश्वास

शरद पवार यांनी सोमवारी सकाळी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून बाहेर आल्यावर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. लोक नक्की घरातून बाहेर पडून मतदान करतील. मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. उत्साहाने लोकांनी मतदान केले पाहिजे. मला असा विश्वास आहे की लोक सदसदविवेकबुद्धिला स्मरून मतदान करतील, असा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

'शिवसेना-भाजप युती २२० जागांच्याही पुढे जाईल असे वाटत नाही'

शरद पवार यांच्यासोबत त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे सुद्धा मतदानाला जाताना उपस्थित होते.