पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२५ वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार विजयी

रोहित पवार विजयी

गेल्या २५ वर्षापासून सत्ता असलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित पवार यांनी ४३ हजार ३४७ मतांनी राम शिंदेंचा पराभव केला. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

१५ अपक्ष आमच्यासोबत: मुख्यमंत्री

कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये तीन वेळा सदाशिव लोखंडे आणि दोन वेळा राम शिंदे आमदार राहिले आहेत. त्यामुळे तब्बत २५ वर्ष या मतदारसंघामध्ये भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी मोठ्या मत्ताधिक्क्यांने विजय मिळवत राम शिंदे यांचा पराभव केला आहे. 

सत्ता स्थापनेची घाई नाही, सर्व पर्याय खुले, उद्धव यांचे दबावतंत्र

रोहित पवार यांना १ लाख ३५ हजार ८२४ मतं मिळाली आहेत. तर राम शिंदे यांना ९२ हजार २४७ मतं मिळाली आहेत. रोहित पवारांच्या दणदणीत विजयानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात एकच जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण करत रोहित पवार यांची मिरवणूक काढण्यात आली आहे. 

साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव, पवारांचा टोला