पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नमिता मुंदडांचा राष्ट्रवादीला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

नमिता मुंदडांचा भाजप प्रवेश

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. नमिता मुंदडा यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, नमिता मुंदडा यांना केज मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

'... तर तेलाच्या किंमती कल्पनेपलीकडे भडकतील'

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीच्या सदस्य पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईमेलद्वारे पाठवून दिला. नमिता मुंदडा यांनी आज परळी येथील गोपीनाथ गडावर भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

सीबीआय म्हणजे देव नाही, सुप्रीम कोर्टाने खडसावले

रविवारी रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी फायनल करण्यात आली. या यादीमध्ये केजमधून नमिता मुंदडा यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. नमिता मुंदडा या दिवंगत राष्ट्रवादीच्या नेत्या विमलताई मुंदडा यांच्या सून आहेत. 

बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर; आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू