पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बारामतीमधून अजित पवारांचा सहज विजय

अजित पवार

गोपीनाथ पडळकर यांच्या अचानक एंट्रीमुळे रंगतदार होईल असे वाटलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक एकतर्फीच झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक लाख ६२ हजार मताधिक्याने विजय मिळवला आहे. बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळीच अजित पवार यांनी आपण एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला होता. तो अखेर खरा ठरला आहे.

विधानसभेची निवडणूक एकतर्फी न होण्याची प्रमुख कारणे

बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खुद्द अजित पवार या मतदारसंघातून १९९१ पासून सलग या मतदारसंघातून निवडून येत आहेत. यावेळी अजित पवार हे प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाच्या प्रचारात अडकले होते. त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामती मतदारसंघात सभा घेतली होती.

धनं'जय' भाऊच ठरले भारी, पंकजा मुंडेंची हॅटट्रिक हुकली! 

बारामती मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ऐनवेळी गोपीनाथ पडळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे या ठिकाणी रंगतदार निवडणूक होईल, अशी शक्यता काही जणांनी वर्तविली होती. गोपीनाथ पडळकर यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधीच पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगली मतदारसंघातून भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांची भाषणे खूप गाजली होती. विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांची भाषणे फारशी गाजली नव्हती.