पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार: नारायण राणे

नारायण राणे

नितेश राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या १५ ऑक्टोबर रोजी भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी कणकवली येथे येणार आहे. त्याचदिवशी स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

मोदी, फडणवीस सरकार शेतकरीविरोधी : अजित पवार

नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथे याबाबतची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप मला ज्या ठिकाणी सभेसाठी पाठवेल तिथे जाण्यास मी तयार आहे असे सांगितले. तसंच यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका देखील केली आहे. कणकवलीतील युती तुटण्याला शिवसेनाच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. 

रस्त्यावर प्रचार सभा घेऊ द्या; मनसेची निवडणूक आयुक्तांकडे मागणी

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार आणि त्यांच्या स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार अशा चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून चर्चांना उधाण आले होते. अखेर नारायण राणे यांनी स्वत: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार असल्याची घोषणा केली आहे. 

पवारांनी १५ वर्षांत महाराष्ट्रासाठी काय केलं, अमित शहांचा सवाल