माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी कणकवली येथे आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या जाहीर सभे दरम्यान नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील भाजपमध्ये विलीन झाला असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचप्रमाणे नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी देखील कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी
या दिवसाची खूप दिवसांपासून वाटत पाहत होते. अखेर आज स्वाभिमानचा भाजप प्रवेश झाला असल्याची घोषणा खुद्द नारायण राणे यांनी केली आहे. गेल्या ५ वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी खूप विकास कामं केली. मी सुध्दा आतापर्यंत पक्षाचे धैर्य -धोरण आणि हितासाठी काम केले आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या हितासाठी आम्ही काम करु असं यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.
मी कसा काय विरोध करू शकतो? - शरद पवार
दरम्यान, नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाचा जिल्हा आहे. मात्र काही दिवसांपासून जिल्ह्याची प्रगती थांबली आहे. त्यामुळे कोकणाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच कोकणात रखडलेली विकास काम पूर्ण करणार आहे. सर्व प्रकल्प गतीमान व्हावेत यासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्र्यांनी यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांडः विम्याच्या पावतीवरुन तिघांचा खून
दरम्यान, 'कोणी किती तर्क काढले तरी सुध्दा मी लोकप्रतिनिधी झाल्यापासून महाराष्ट्रातील जनतेसाठी, कोकणासाठी आणि सिंधुदुर्गातील लोकांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. कोकणातील गरिबी जावी समृध्दी यावी या भावनेतून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे यावेळी नारायण राणे यांनी सांगितले. तसंच, उरलेल्या आयुष्यात महाराष्ट्रातील जनतेला माझ्या कामाचा उपयोग व्हावा. प्रगतीला हातभार लागावा यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले.