पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाघाचे नाव घेणे शोभत नाही, शेळी-मेंढीचे घ्या; राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

नारायण राणे

आम्ही वाघ आहोत, असे म्हणणे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. त्यांनी शेळी-मेंढीचे नाव घेतले पाहिजे. नुसते मर्द आहोत, असे म्हणून भागत नाही. तर मर्दानगी दाखवावीही लागते, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपत प्रवेश केलेले नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. सावंतवाडीमधील जाहीर सभेत शुक्रवारी त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली.

भाजपच्या मंत्र्यानेच 'चंपा' शब्द तयार केला, अजित पवारांचा गौप्यस्फोट

मी जर असा-तसा होतो तर मला मुख्यमंत्री का करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करून नारायण राणे म्हणाले, तुमची लायकी होती तर तुम्हाला बाळासाहेबांनी कोणते पद का दिले नाही. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल उद्धव ठाकरे यांना काहीही माहिती नाही. थोडे दिवस थांबा. २५ तारखेपासून माझेच दिवस सुरू होणार आहेत. त्या दिवशी मातोश्रीसमोर जाऊन बोलेन आणि त्यांचे तोंड बंद करेन, असे राणे म्हणाले.

काँग्रेसच्या प्रचारातून आक्रमकपणा 'गायब', नेत्यांची पाठ

याच आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी कणकवलीमधील सभेत नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राणे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला.