पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसचे नाना पटोले महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

नाना पटोले

महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे विधिमंडळाचे गटनेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. 

विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही शनिवारी दुपारी १२ पर्यंत आहे. तत्पूर्वी, पटोले हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. पटोले हे तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले आहेत. 

बहुमत चाचणीवर संजय राऊत म्हणतात, 170+++++

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर ते लोकसभेवर निवडून गेले होते. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. संपूर्ण देशभरात मोदींविरोधात आवाज उठवणारे ते पहिलेच खासदार होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यांनी गडकरी यांनी तगडी लढत दिली होती. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काटोल मतदारसंघातून विजय मिळवला होता. 

धुळेः मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, ७ जण ठार

काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु होती असे सांगितले जाते. परंतु, पटोले यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला.