पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेल्या १० वर्षांच्या तुलनेत मुंबईत सर्वात कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईतल्या ३६ मतदार संघासाठी यंदा गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अपक्ष निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संख्येतही घट झाली असल्याची माहिती ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या ३६ मतदार संघासाठी एकूण ४२४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातले १९४ उमेदवार हे अपक्ष निवडणूक लढवत होते.  

राज ठाकरे यांनी घेतले कसबा गणपतीचे दर्शन

२०१४ मध्ये तब्बल ५१७  उमेदवारांनी अर्ज दाखल केला. यात १७४ अपक्ष उमेदवार होते. मात्र या वर्षी ३३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यात एकूण ९१ उमेदवार हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. 

राज्यात  भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर मित्रपक्षांची युती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या  आघाडीमुळे उमेदवारांची संख्या घटली आहे. यापूर्वी हे पक्ष एकत्र निवडणुक न लढवता स्वबळावर निवडणूक लढवत होते, असं निरिक्षण तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. 

शिंदेंपेक्षा राष्ट्रवादी मला अधिक कळते: शरद पवार

आर्थिक मंदीमुळेही काहीजण निवडणूक लढवत नसल्याचं मत राजकीय  विश्लेषक निळू दामले यांनी व्यक्त केलं आहे. 'ज्यांना निवडणूक लढवायची आहेत ते लहान पक्षातले आहे किंवा अपक्ष आहेत. त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मतांचं विभाजन करण्यासाठी अनेकदा अपक्ष उमेदवार उभे केले जायचे. मात्र आता सत्तेत असलेल्या पक्षाविरोधात अपक्ष उमेदवारावर पैसे लावण्याइतकं धन कदाचित इतर पक्षाकडे नसावं', असं मत दामलेंनी व्यक्त केलं आहे. 

'चंपा'ला शरद पवारांशिवाय काहीच दिसत नाहीः अजित पवार