पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोदी है तो मुमकीन है

देवेंद्र फडणवीस  HT Photo by Kunal Patil

सकाळी ८ च्या सुमारास मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच जाहीर संवाद साधला. मोदी है तो मुमकिन है, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंबई येथील भाजप कार्यालयात येत त्यांनी सत्कार स्वीकारत आनंदोत्सव साजरा केला. छत्रपतींच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवणार असून अजितदादांबरोबर स्थिर सरकार देऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अजित पवारांच्या समर्थनातून मजबूत सरकार देणार असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेने छत्रपतींची भाषा बोलू नये, रविशंकर प्रसाद यांची टीका

मुंबईतील प्रदेश कार्यालयात मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. कार्यकर्ते ढोल-ताशे वाजवत एकमेकांना लाडू भरवत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. 

अजित पवारांना 'ब्लॅकमेल' केलंय, संजय राऊत यांचा आरोप

चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांना लाडू भरवला. तत्पूर्वी फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, अजित पवार परत येण्याची शक्यता आहे. त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे सर्व आम्ही जनतेसमोर आणणार असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क झाल्याचेही सांगितले. हिम्मत असेल तर भाजपने बहुमत सिद्ध करुन दाखवावेच, असे आव्हानही त्यांनी दिले.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना बहुमत चाचणी जिंकणार: अहमद पटेल