पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विश्वासदर्शक ठरावावेळी चार आमदारांची तटस्थ भूमिका

मनसे आमदार प्रमोद पाटील

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १६९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपने शपथविधी आणि अधिवेशनावरच आक्षेप घेत सभात्याग केला. त्यामुळे या सरकारविरोधात ० मते पडली. विश्वासदर्शक ठरावावेळी ४ जणांनी तटस्थ राहणे पसंत केले. यामध्ये मनसे, एमआयएम आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा समावेश आहे. 

छत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाहीः उद्धव ठाकरे

मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील, एमआयएमचे आमदार मोहम्मद इस्माईल, शहा फारूख अन्वर आणि मार्क्सवादीचे विनोद निकोले यांनी तटस्थ भूमिका घेतली.

महापुरुषांबद्दल भाजपला इतकी असूया का आहे; जयंत पाटलांचा सवाल

दरम्यान, विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार म्हणाले की, आम्ही विनोद निकोले यांना निवडणुकीवेळी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचे आम्हाला मत मिळेल, असे वाटले होते. परंतु त्यांनी तटस्थ राहिल्याने आम्हाला एक मत कमी पडले. 

'आम्ही १६९'!, महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला