विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पुण्यामध्ये होणारी सभा पावसामुळे रद्द झाली. कसबा पेठेतील ज्या मैदानावर त्यांची सभा होणार होती त्या ठिकाणी पाणी आणि चिखल साचला होता. त्यामुळे आता मैदाना ऐवजी रस्त्यांवर प्रचार सभा घेण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी मनसेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
मैदाना ऐवजी रस्त्यांवर प्रचार सभा घेण्यासाठी परवानगी द्या. मनसेने राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. pic.twitter.com/ign8YW9LUt
— Marathi Hindustan Times (@HTMarathi) October 10, 2019
पवारांनी १५ वर्षांत महाराष्ट्रासाठी काय केलं, अमित शहांचा सवाल
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी मनसेने महाराष्ट्रातील विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये सभांचे आयोजन केले आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक शहरांमध्ये खासगी मैदान आरक्षित केली आहेत. मात्र परतीच्या पावसामुळे मैदानात चिखल आणि पाणी साचते. त्यामुळे प्रचार सभा रद्द कराव्या लागत आहेत. सर्वच राजकीय पक्षांना याचा फटका बसत असल्याचे मनसेने पत्रामध्ये म्हटले आहे.
सरकारचा पीएमसी बँक घोटाळ्याशी काहीही संबंध नाही: निर्मला सीतारामन
दरम्यान, येत्या २० ते २१ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस लांबू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे आमचे उमेदवार जाहीर संभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक शहरांमधील रस्त्यांवर जाहीर सभा घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
फडणवीसांनी राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज करून ठेवले - शरद पवार