पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात नाही पाण्यात राहतोय सांगा : राज ठाकरे

पुण्यासारखे शहर विस्कळीत होत असेल तर काय करायचे?

यंदाच्या मान्सूनमध्ये कमी वेळात प्रचंड पाऊस झाल्यानंतर पुणे शहराची तुम्बापूरी झाल्याचे पाहायला मिळाले. परतीच्या पावसामुळे पुण्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचेही चित्र पुणेकरांनी अनुभवले. पावसाळ्यात मुंबईची अवस्था होते तशीच काहीशी अवस्था यंदा परतीच्या पावसाने पुणे शहराची केली. तासाभराच्या पावसानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साठले होते. मुंबईतील आपल्या पहिल्या प्रचार सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात तुंबणाऱ्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. एक-दिड तासांच्या पावसानं पुणे का भरते? असा सवाल उपस्थित करत पुणे शहरातील नियोजन कोलमडल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.  

मोदी, फडणवीस सरकार शेतकरीविरोधी : अजित पवार

पुण्यातील पावसामुळे रद्द झालेल्या सभेचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले की,  काल पुण्यात सभा होती. त्याठिकाणी काल अर्धा पाउण तास पडलेल्या पावसाने शहराची पूर्ती वाट लागली. वाहतूक व्यवस्था कोलमडली. एका वाहन चालकाने जीव गमावला. मी ज्या ठिकाणी होता त्या भागात सहावाजल्यापासून साडेदहापर्यंत वीज नव्हती. शहरांचा विचका झालाय. निवडणूका येतात. आश्वासन दिली जातात. पण दिवसेंदिवस शहरे बरबाद होताना दिसतय. पुण्यासारखे शहर विस्कळीत होत असेल तर काय करायचे? पुण्यातून निघताना सकाळी परिचयातील लोकांना फोन केले. कोणी कुठे राहता विचारलं तर पुण्यात नाही पाण्यात रोहतोय सांगा! असा सल्ला दिल्याचे सांगत त्यांनी शहराचे नियोजन कोलमडल्याच्या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार: नारायण राणे

उल्लेखनिय आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी पुण्यातून प्रचार सभेला सुरुवात होणार होती. मात्र मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द करावी लागली होती. पुण्यातील पाणी-पाणी परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या मुंबईतील पहिल्या सभेत त्यांनी पुण्यातील पावसाचा दाखला देत शहरांचे नियोजन कोलमडल्याचा उल्लेख करुन त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.