पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरेंच्या सभास्थळी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य

राज ठाकरेंचे सभास्थळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे. सभास्थळी जय्यत तयारी सुरु आहे. मात्र पुण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सभास्थळी पाणी आणि चिखलाचे साम्राज्य आहे.

वाशी स्थानकावर लोकलच्या पेंटाग्राफला आग; हार्बर रेल्वे विस्कळीत

मनसेला पुण्यातील सभेसाठी जागा मिळत नव्हते. अनेक प्रयत्नांनंतर मनसेला सभेसाठी सरस्वती विद्या मंदिर मैदान उपलब्ध झाले. राज ठाकरे याठिकाणावरुन प्रचाराला सुरुवात करणार आहेत. पुण्यातील उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. मनसेने कसबापेठ येथे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याविरोधात अजय शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 

पाकिस्तानी आहात का?, भरसभेत भाजपच्या उमेदवाराने विचारला

पुण्यातील सरस्वती मंदिर मैदानावर राज यांच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सभास्थळी पाणी साचले आहे आणि चिखलाचे साम्राज्य आहे. पावसाचे पाणी काढण्याचे आणि भुसा टाकून चिखल बुजवण्याचे काम सुरु आहे. संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात होणार असून यावेळी ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

... म्हणून नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यातील चर्चा