पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथविधीसाठी शिवतिर्थावर दिग्गजांची उपस्थिती

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमासाठी दिग्गज नेते उपस्थित आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे कुटुंबियासंह शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. याच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ देखील या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थिती लावली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: MNS Chief Raj Thackeray and other politcl leder attending oath ceremonyof CM designate Uddhav Thackeray and other Maha Vikas Aghadi leaders