पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला देशातला खलनायक ठरवलं- राज ठाकरे

राज ठाकरे

भूमिपुत्रांसाठी आवाज उठवला म्हणून मला देशातला खलनायक ठरवलं, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची नवी मुंबईत सभा आयोजित करण्यात आली. या प्रचारसभेत परप्रांतियांच्या मुद्यावरून राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

भाजपच्या मंत्र्यानेच 'चंपा' शब्द तयार केला, अजित पवारांचा गौप्यस्फोट

'गुजरातमधून हजारो उत्तर भारतीयांना  अल्पेश ठाकोरनं हाकललं, मात्र यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. पण मी महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतियांच्या  मुद्यावर आवाज उठवला असता मला देशातला खलनायक ठरवण्यात आलं. दररोज राज्यात येणाऱ्या लोंढ्यामुळे महाराष्ट्राच्या साधनसंपत्तीवर ताण पडतोय त्यामुळे इथल्या भूमिपुत्रांचा विकास होऊ शकत नाहीये. भूमिपुत्रांसाठी  लढलो  म्हणून असंख्य खटले माझ्यावर दाखल करण्यात आले आहेत', असं म्हणत प्रचारसभेच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा राज ठाकरे भूमिपुत्रांसाठी आक्रमक झाले आहेत. 

वारं फिरलंय, इतिहास घडणार, शरद पवारांचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक

वाघाचे नाव घेणे शोभत नाही, शेळी-मेंढीचे घ्या; राणेंची टीका

मतदारांनी जागरूक असले पाहिजे, आतापर्यंत सरकारनं अनेक आश्वासनं  दिली मात्र त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. शिवसेना भाजपने त्यांच्या २०१४ च्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलं होतं मात्र ते अजूनही पूर्ण झालेलं नाही, अशी तोफ युतीवर राज ठाकरेंनी डागली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: MNS Chief Raj Thackeray addresses public rally ahead of Maharashtra State Assembly Election navi mumbai