पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

असा असेल सत्तास्थापनेसाठीचा गुलदस्त्यातील फॉर्म्युला!

सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे

राज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्ली दरबारात बैठकांचे सत्र सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या स्वतंत्रपणे बैठका गुरुवारी पार पडल्या. त्यानंतर दोन्ही आघाडीची संयुक्त बैठक होणार या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर दोन्ही पक्षांचे नेते मुंबईला परतणार आहेत. शुक्रवारी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील अंतिम बैठक होण्याची अपेक्षा आहे. या बैठकीनंतर सत्तास्थापनेबाबतचे चित्र अधिकृतरित्या स्पष्ट होईल. 

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला काँग्रेस कार्यकारिणीकडून हिरवा कंदील

बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकसूत्री कार्यक्रमावर एकमत झाले. त्यानंतर आज (गुरुवारी) पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ६ जनपथ वरील शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपाच्या संदर्भात तडजोड न करता समसमान वाटा मिळवण्याबाबतची चर्चा झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यापेक्षा कमी जागा असल्या तरी आताच्या घडीला त्यांचे महत्त्व नाकारता येणार नाही.  

'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'

एएनआयच्या वृत्तानुसार,  विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानुसार, मंत्रीपदाचा तिढा सोडवण्यात येणार आहे. या फॉर्म्युल्याने प्रत्येक आमदारामागे ४ प्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी यांना प्रत्येकी १५-१५ तर काँग्रेसच्या वाट्याला १२ मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागांवर यश मिळाले होते. सध्याच्या घडीच राजकीय चित्र पाहता काँग्रेस समसमान जागेसाठी आग्रही असेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याचा अंतिम निर्णय काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ministerial berths according to their strength in the assembly on the formation of government in Maharashtra between the Congress Shiv Sena and NCP