पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूक : दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री रवाना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा (संग्रहित छायाचित्र)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात गुरुवारी एक महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. 

औरंगाबादमध्ये पूर्ववैमनस्यातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना उद्या, शुक्रवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर येत्या ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप आणि शिवसेना युतीचा फॉर्म्युला अजून जाहीर झालेला नाही. भाजप आणि शिवसेना किती जागांवर उमेदवार उभे करणार आणि मित्रपक्षांसाठी किती जागा सोडल्या जाणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष पंधरवडा संपल्यावर येत्या रविवारी किंवा त्यानंतर युती संदर्भातील माहिती जाहीर केली जाऊ शकते.

पुण्यात अतिप्रचंड पावसामुळे हाहाकार

भाजपकडून कोणत्या उमेदवारांना संधी द्यायची, यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये नव्याने आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जाणार का, कोणत्या मतदारसंघांमध्ये स्थानिक आमदाराऐवजी दुसऱ्या नेत्याला संधी दिली जाणार हे सुद्धा या बैठकीत चर्चिले जाऊ शकते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:meeting over the upcoming Maharashtra assembly elections will be held today at BJP Headquarters