पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सारखं कुंकू बदलायचं नसतं, शरद पवारांचा जयदत्त क्षीरसागरांना टोला

शरद पवार

मी गुदमरलो होतो म्हणून त्या घरी गेलो असे सांगत इथल्या नेतृत्वाने नवा घरोबा केला. ज्यांना तीन वेळा मंत्री केलं, सत्तेची ऊब आणि शक्ती दिली ते असं वागले, असे म्हणत असं सारखं कुंकू बदलायचं नसतं. घरोबा एकदाच करायचा असतो आणि तिथे प्रामाणिकपणाने राहायचं असतं. दुसऱ्या घरोब्याचा शोध केला तर लोक त्याबद्दल काय बोलतात हे न बोललेलंच बरं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लगावला.

'पाच वर्षांत नरेंद्र-देवेंद्र फॉर्म्युला सुपर हिट'

बीड शहर मतदारसंघाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, बीडला सध्या एक वेगळेच वातावरण आहे. आपण ज्यांना साथ दिली, त्यांनी भलत्याच घरी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्णय बीडकरांनी घेतला आहे. 

पृथ्वीराजबाबांना त्यांच्या घरचीही मतं मिळणार नाहीतः उदयनराजे

१९८० साली मी बीड जिल्ह्यात निवडणुकीसाठी जे उमेदवार दिले, ते सगळे निवडून आले. त्याची पुनरावृत्ती यावेळी नक्की होणार. आज नवी पिढी उभारण्याची भूमिका आपण घेतली आहे. या भूमिकेला मोठा पाठिंबा बीड जिल्ह्यातून मिळतोय. परिवर्तनाच्या या लढ्यात बीडची जनता पुढाकार घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:marathi assembly election 2019 ncp leader sharad pawar slams on jaydatta kshirsagar in beed