पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपाली सय्यद शिवसेनेत; कळव्यातून लढवणार निवडणूक

दीपाली सय्यद यांनी शिवसेनेत केला प्रवेश

प्रसिध्द अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या दीपाली सय्यद यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी दीपाली सय्यद यांच्या हातात शिवबंधन बांधले. तर शिवसेनेकडून दीपाली सय्यद या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

 

उद्धव ठाकरेंची वचनपूर्ती! श्रीनिवास वनगा यांना दिले तिकीट

दीपाली सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली. शिवसेनेकडून कळवा-मुंब्रा मतदारसंघातून दीपाली सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेद्र आव्हाड यांना दीपाली सय्यद यांच्याकडून मोठे आव्हान मिळणार आहे. शुक्रवारी सकाळी दीपाली सय्यद या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

उद्धव ठाकरेंची वचनपूर्ती! श्रीनिवास वनगा यांना दिले तिकीट

दीपाली सय्यद यांनी २०१४ साली आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. अहमदनर लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आपला रामराम ठोकत त्या शिवसंग्राम पक्षामध्ये गेल्या होत्या. त्या शिवसंग्राम महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा होत्या. अहमदनगरमधील ३५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी दीपाली सय्यद यांनी आमरण उपोषण केले होते.  

उद्धव ठाकरेंची वचनपूर्ती! श्रीनिवास वनगा यांना दिले तिकीट

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:marathi actress deepali sayyad joins shivsena will contest assembly election from mumbra kalwa constituency