पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हालचाली तीव्रः मल्लिकार्जून खर्गेंनी घेतली काँग्रेस आमदारांची भेट

मल्लिकार्जून खर्गे

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी रस्सीखेच सुरु असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी नवनिर्वाचित आमदारांची भेट घेऊन राजकीय स्थितीवर चर्चा केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी 'पीटीआय-भाषा' या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस खर्गे यांनी पक्षाच्या आमदारांची अनौपचारिक भेट घेतली. 

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे राज्याची गरज', मातोश्रीबाहेर होर्डिंग

माणिकराव ठाकरे म्हणाले की, खर्गे हे आमदारांचे म्हणणे पक्षाच्या नेतृत्वाला सांगतील. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व ४४ आमदार काँग्रेस शासित राजस्थानची राजधानी जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये उतरले आहेत. भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ नये यासाठी सर्व आमदारांना तिकडे नेल्याचे सांगण्यात येते.

...म्हणून शिवसेनेसह काँग्रेसच्या गोटातील हालचाली वाढल्या

राज्यात २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे.

कोंडी कायम असताना राज्यपालांकडून BJP ला सत्तास्थापनेचे आमंत्रण

मुख्यमंत्रिपदावरुन भाजप आणि शिवसेनेत संघर्ष सुरु आहे. शिवसेनेने ५०:५० फॉर्म्युलाची गरज व्यक्त केली आहे तर भाजप यासाठी तयार नाही.