पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंकजा मुंडे भोवळ येऊन व्यासपीठावर कोसळल्या

पंकजा मुंडे भोवळ येऊन स्टेजवरच कोसळल्या

परळी येथील सभेत आपल्या भाषणानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या भोवळ आल्याने स्टेजवरच कोसळल्या. स्टेजवर उपस्थित असलेले त्यांचे पती अमित पालवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे त्वरीत धाव घेऊन त्यांना सावरले. दरम्यान, राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि रासपचे नेते महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांची प्रकृती व्यवस्थित असून गेल्या काही दिवसांपासून प्रचारासाठी होत असलेल्या धावपळीमुळे आलेला थकव्यामुळे भोवळ आल्याचे सांगितले. 

हा बारामतीकर तुम्हाला पुरुन उरेल!

प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. पंकजा मुंडे यांनी दिवसभरात तीन सभा, रॅली केल्या होत्या. सायंकाळी परळी येथे त्यांची शेवटची सभा होती. त्यावेळी त्या बोलायला उभ्या राहिल्या. काहीवेळी त्यांनी भावनिक भाषण केले. समारोपानंतर अचानक त्यांना भोवळ आली आणि त्या खाली कोसळल्या. त्यावेळी पती अमित पालवे आणि इतरांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी पंकजा यांना सावरले. त्यानंतर काही वेळाने त्या स्वतः चालत आपल्या वाहनाकडे गेल्या. रुग्णालयात त्यांना दाखवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

'अरे ला कारे' म्हणण्याची धमक ठेवा, राज ठाकरेंचे आवाहन

दरम्यान, महादेव जानकर यांनी पंकजा यांची प्रकृती स्थिर असून त्या घरी विश्रांती घेत असल्याचे त्यांनी म्हटले. तर भाजप नेते सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या टीकेमुळे पंकजा या दिवसभर अस्वस्थ होत्या, असे म्हटले आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले.

अरे उद्धवा! तेव्हा १ रुपयांत आरोग्य तपासणी का नाही केली?