पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसला सतावतेय भीती; केली 'ही' मागणी

शरद पवार आणि उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये एकजूट आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांना भेटून त्यांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नात आहेत. तरी पण तिन्ही पक्षांना भीतीही सतावत आहे. त्याचमुळे तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पाठवले आहे. विधानसभेतील बहुमत चाचणीदरम्यान काही आमदार गट बदलू शकतात ही शक्यता पक्षांच्या रणनीतीकारांनी नाकारली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विधानसभेत मतदानाची मागणी केली आहे. 

विधानसभेत बहुमताची चाचणी करताना मतदानाचे व्हिडिओ शुटिंग केले जावे. त्यामुळे कोणत्या आमदाराने बाजू बदलली, किती आमदारांनी मतदानात भाग घेतला नाही, हे समजेल. त्यामुळे या आमदारांविरोधात आम्हाला कारवाई करता येईल, असे राज्यातील एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

'अजितदादा म्हणाले, भाजप-NCPचे सरकार बनणार आहे, तुम्ही या'

दुसरीकडे काँग्रेसच्या मते, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत काही सांगणे हे घाईचे ठरेल. विश्वासदर्शक ठरावावेळी मतदानावेळी आत काय होईल, हे सांगणे कठीण आहे, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीवर पकड आहे. अशावेळी किती आमदार त्यांच्यासोबत जातील हे सांगता येत नाही.

प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या मते, विश्वासदर्शक ठरावावेळी पक्ष बदलल्याने सदस्यत्व गमावण्याची आमदारांना भीती नाही. कारण कर्नाटकात अयोग्य ठरवलेले काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना भाजपने निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत विधानसभा अध्यक्षही भाजपचाच असेल आणि अशात आमदारांच्या अयोग्यतेवर निर्णय घेण्यासही वेळ लागू शकतो.

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, राहुल गांधींचा घणाघाती आरोप