पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात ‘राज’गर्जना, मनसेच्या प्रचारास होणार प्रारंभ

पुण्यात 'राज'गर्जना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराचा  नारळ पुण्यात फुटणार आहे. बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांची पुण्यातील सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे. 

काश्मीर गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय

आजपासून खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना सुरुवात होणार आहे.  मात्र, या सभा घेण्यासाठी शहराच्या अनेक भागांत मैदानेच उपलब्ध नसल्याच्या समस्येला मनसेला  सामोर जावं लागलं. १ ऑक्टोबर रोजी मनसेकडून टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणारं पत्र लिहिण्यात आलं होतं. मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर पक्षाकडून सरस्वती विद्या मंदिरच्या मैदानासाठी अर्ज करण्यात आला. नातू बाग येथील सरस्वती विद्या मंदिराचे मैदान सभेसाठी अखेर राज ठाकरेंना मिळाले. त्यामुळे पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारांसाठी  राज ठाकरे  सभा घेणार आहेत. 

२८८ जागा आणि ३२३९ उमेदवार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार

उद्या पार पडणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.