पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेट अन् राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते : गडकरी

नितीन गडकरी

राज्यात सत्ता स्थापनेचा मुहूर्त कधी ठरणार आणि बाजी नेमकी कोण मारणार? याबाबत अंदाज लावणे सध्याच्या घडीला तरी अशक्यच आहे. राज्यातील गुंतागुतीच्या राजकीय परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मास्टर स्ट्रोक लगावला आहे. क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते. कधी कधी सामना आपल्या हातून निसटला आहे असे वाटते. मात्र निकाल अगदी वेगळा लागतो. पराभूत झाल्याचे वाटत असताना सामना जिंकला जाऊ शकतो, असे विधान त्यांनी एका कार्यक्रमामध्ये केले. त्यांच्या या वक्तव्यातून भाजप सत्ता स्थापनेबाबत अजूनही सकारात्मक असल्याचे संकेत मिळतात.  

एकसूत्री कार्यक्रमाचा मसुदा तयार, पक्षश्रेष्ठी घेणार अंतिम निर्णय

महायुतीला स्पष्ट बहुमत असताना शिवसेना-भाजप आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवटीनंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एक सूत्री कार्यक्रमाचा आराखडा तयार करत सत्तास्थापनेच्या दिशेने वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत. 

सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर आमचे लक्ष: भाजप

दुसरीकडे भाजपच्याही बैठकीवर बैठकी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सत्तास्थापनेबद्दल आम्ही प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर नुकतीच मुंबईत भाजपच्या नव निर्वाचित आमदारांची बैठक देखील पार पडली. या बैठकीनंतर शेलार यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे म्हटले होते. राज्यातील घडामोडींसदर्भात अधिक माहिती नसल्याचे सांगताना नितीन गडकरींनी भाजप अजूनही सत्ता स्थापनेच्या शर्यतीत असल्याचे संकेतच दिले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra govt formation Anything can happen in cricket and politics says Union Min Nitin Gadkari