पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर आमचे लक्ष: भाजप

भाजप-शिवसेना यांच्यात चर्चेनेच तोडगा निघू शकेल, असेही गिरिश महाजन यांनी म्हटले आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लगावला आहे. भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना मार्गदर्शन केले, अशी माहिती शेलार यांनी दिली. 

एकसूत्री कार्यक्रमाचा मसूदा तयार, पक्षश्रेष्ठी घेणार अंतिम निर्णय

बैठकीतील निर्णयाबाबत ते म्हणाले की, ९० हजार बुथवर संघटनात्मन निवडणुका होणार आहेत. त्यासंदर्भात या बैठकीत नियोजन करण्यात आले. याशिवाय शुक्रवार पासून ग्रामीण तर शनिवारपासून ग्रामीण मतदार संघातील आमदार आपापल्या मतदार संघात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत पुरवता येईल, यासंदर्भात ते आढाव घेतील. 

राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नवे दरवाजे उघडले : राहुल गांधी

राज्यातील विधानसभा निवडणूकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपची शिवसेनेने साथ सोडल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याला शेलारांनी नाट्यमय घडामोडींची उपमा दिली. राज्यातील तीन अंकी नाट्यावर कोअर कमिटी नजर ठेवून असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra govt formation ahish shelar target on Shiv Sena Congress and ncp political movement