पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनिया गांधी 'राजी', काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक निर्णायक ठरणार?

सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्याच्या हालचाली सध्या वेगाने सुरु आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निर्णायक बैठकीपूर्वी राज्यातील आणि केंद्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी राज्यातील राजकीय घडामोडींसदर्भात चर्चा केली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते. 

'उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार'

सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीला मल्लिकार्जून खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यासह अन्य काही दिग्गज नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात ही बैठक सकारात्मक झाल्याचे सूत्रांकडून समजते. या बैठकीनंतर  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे. राज्यातील सरकार स्थापनेच्या दृष्टिने ही बैठक निर्णायक मानली जात आहे.