पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शिवसेनेवर विश्वास आहे; बाकी सब बकवास है!

शिवसेना

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपने असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेने हा धनुष्य सक्षमपणे उचलण्याची तयारी केली आहे. सत्ता संघर्षाचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीसह टोकाचे मतभेद असलेल्या काँग्रेसचेही मनधरणी केली आहे.  

सेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात

शिवसेनेच्या यशाचे संकेत दिसत असताना शिवसेनेच्या आमदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मालाडच्या हॉटेल रिट्रिटमध्ये असलेल्या आमदारांनी  घोषणाबाजी करत सरकार स्थापनेपूर्वीच आनंद व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे बाकी सब बकवास है! शिवसेनेवर विश्वास आहे बाकी सब बकवास है! अशा घोषणा शिवसैनिक आणि आमदारांनी दिल्याचे पाहायला मिळाले.   

 राज्यातील सत्तासंघर्षाच्या अपडेट्स

मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावरुन भाजप-शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाली होती. भाजप फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यावर ठाम राहिले. मात्र शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करण्यात अडथळे येण्याचे चित्र दिसल्यानंतर भाजपने सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. शिवसेना  आघाडीचा पाठिंबा मिळवणार का? हा मोठा प्रश्न होता. मात्र हा प्रश्न सुटला असून शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.