पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता संघर्ष मिटणार, पण आघाडी-सेनेचा फॉर्म्युला गुलदस्त्यातच

राज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीतील घडामोडींना वेग

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरु आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी खलबतं झाली. बैठकीदरम्यान आघाडीकडून शिवसेनेसोबत सरकार स्थापनेचे संकेत देण्यात आले. बैठक संपल्यानंतर गुरुवारी पुन्हा दोन्ही पक्षांतील नेते दिल्लीमध्ये चर्चा करणार आहोत. गुरुवारी दिल्लीमध्ये आणखी काही मुद्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील नेत्यांमध्ये एकत्रित चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. शुक्रवारी जागावाटपासंदर्भातील सर्व मुद्दे स्पष्ट होतील, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाणांनी दिली.  

झारखंडमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात सत्तास्थापन करुन भाजपला दणका देण्याचा मानस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ३० नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात झारखंडमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि युतीतून बाहेर पडलेली शिवसेना एकत्रितपणे सत्ता स्थापन करु शकतात, असे बोलले जात होते. या मुद्यावर देखील चव्हाणांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, झारखंडमध्ये होणारी आगामी निवडणूक आणि राज्यातील सत्तास्थापनेचा काहीही संबंध नाही. राज्यात लवकरात लवकर सत्तास्थापनेबाबत आम्ही सकारात्मक आहोत.    

राज्याला लवकरच पर्यायी सरकार देऊ, पण...

राष्ट्रवादी-काँग्रेसच्या बैठक सुरु असताना काही मुद्द्यांवरील चर्चेनंतर काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अहमद पटेल, मल्लिकार्जू खर्गे, के.सी. वेणुगापाल या नेत्यांनी बैठकीत झालेली चर्चा सोनिया गांधींना प्रत्यक्ष भेटून कळवल्याचे समजते. या नेत्यांनी  सोनिया गांधींची भेट घेतल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर  हे नेते पुन्हा बैठकीमध्ये सामिल झाले होते. यावर लंच ब्रेकमध्ये काही नेत्यांनी आपली कामे पूर्ण केली असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

पेढ्यांची ऑर्डर दिली असं समजा : संजय राऊत

दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचेही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी बैठकीतील माहिती घेण्यासाठी शरद पवार यांना भेटणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. शरद पवार यांच्या भेटीपूर्वी ते सोनिया गांधींशी भेटणार की त्यानंतर ते सोनिया गांधींना भेटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दिल्लीत घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कळवत असल्याची माहितीही खुद्द राऊतांनी प्रसारमाध्यमांनी दिली होती.  एकंदरीत राज्यातील सत्तास्थापनेला आता वेग आला असून तिन्ही पक्ष मिळून भाजपला सत्ता स्थापनेची गोड बातमी ऐकवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसते. हे तिन्ही पक्ष एकत्रित येणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाला असला तरी आघाडी आणि शिवसेना यांच्यातील फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यातच आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra government formation Sanjay Raut Meet Sonia Gandhi congress ncp alliance with Shiv Sena