पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...मग भाजपला भीती कशाची, पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

पृथ्वीराज चव्हाण

राज्यातील फडणवीस सरकार अनैतिक असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळेच ते बहुमत सिद्ध करण्यासाठी घाबरत आहेत, असा आरोपही माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. जर भाजपकडे बहुमत असेल तर फ्लोअर टेस्टची  त्यांना भीती का? असा प्रश्न त्यांनी भाजपला केला आहे. 

सुप्रीम कोर्टाची फडणवीस, अजित पवारांना नोटीस; उद्या पुन्हा सुनावणी

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याच्या आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या संयुक्त याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

अजित पवारांनी चूक मान्य करावीः नवाब मलिक

चव्हाण म्हणाले की, रविवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली याबद्दल सर्वप्रथम मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. भाजपकडे बहुमताचा आकडा नाही. तरी सुद्धा त्यांनी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. ते फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करु शकणार नाहीत. राज्यातील फडणवीस सरकार अनैतिक आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या आमच्या बाजूने निकाल देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फ्लोअर टेस्ट लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तिन्ही पक्षांनी न्यायालयाकडे केली आहे.   

अजित पवारांनी चूक मान्य करावीः नवाब मलिक

राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत असताना शनिवारी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादीची भाजप सरकारला साथ असल्याचे चित्र समोर आले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांची भूमिकाही पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली आहे.