पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांनी राजकारणातील चाणक्यावर केली मात, राष्ट्रवादीचा भाजपला टोला

शरद पवार

महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पुढे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी भारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्यावर मात केली असल्याचे टि्वट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे. दिल्लीसमोर महाराष्ट्राला झुकू दिले नसल्याचे त्यांनी आवर्जून म्हटले आहे.

'दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त', शिवसेनेबरोबरील आघाडीवर अबू आझमींचं मत

मलिक यांनी आपल्या टि्वटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता म्हटले की, अखेर भारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्यांवर पवारसाहेबांनी मात केली आहे. महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकणार नाही. जय महाराष्ट्र! मलिक यांचा हा टोला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना असल्याचे मानले जाते. अमित शहा यांनी विविध निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून देण्यात आणि सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची निभावत आले आहेत.

सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसला 'न्याय' मिळणार का?

भाजप आणि शिवसेनेने एकत्रित विधानसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये भाजपला १०५ जागा आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. पंरतु, नंतर मुख्यमंत्रिपदावरुन दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यांची युती तुटली. आता सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्रात १२ नोव्हेंबरबासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

'आमचं ठरलंय! सेनेसोबतच्या चर्चेनंतर अधिकृत घोषणा करायची'