पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमचं अजून ठरलेलं नाही, आघाडीने मांडली भूमिका

आघाडीने प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली

राज्यातील विधानसभा निकालानंतर जनतेने दिलेला कौल स्वीकारत विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवलेल्या काँग्रेस आघाडीच्या हाती सत्तेची सूत्रे आली आहेत. सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेनेने पाठिंबा मागितला असून यासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या दिड तासाच्या बैठकीनंतर पहिल्यांदा शिवसेनेकडून प्रस्ताव आल्याचे अधिकृतपणे सांगितले.  

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राष्ट्रपतींची स्वाक्षरी

शिवसेनेने ११ नोव्हेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर अधिकृतरित्या प्रस्ताव ठेवला. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी यावेळी सांगितले. सरकार स्थापन करायचे का नाही? यावर आमच्यात पहिल्यांदा चर्चा होईल. एक कलमी कार्यक्रम काय असेल याचा विचार केला जाईल. हा निर्णय झाल्यानंतर आम्ही पुढे काय करायचे ठरवू, असे आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यपाल भाजपचे बाहुले आहेत का?: सचिन सावंत

पुढील निर्णय घेण्यासाठी किती वेळ लागेल? असा प्रश्न राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर राज्यपालांनी आम्हाला खूप वेळ दिला आहे, असे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी काँग्रेसला निमंत्रण न देता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. या बैठकीनंतर या दोन्ही पक्षांच्या भूमिकेवर शिवसेनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.