पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता स्थापनेसाठी भाजप असमर्थ,चंद्रकांत पाटील यांची घोषणा

भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले

भाजपच्या कोअर कमिटीच्या तासाभराची बैठक संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला होता. सध्याच्या घडीला शिवसेना आमच्यासोबत नाही. त्यांना काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर करु देत. आम्ही जनमताचा अनादर करणार नाही. राज्यपालांना यांसदर्भातील माहिती दिली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

रविवारी झालेल्या दुसऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर  मुख्यमंत्र्यांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यासह न अन्य काही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. असे भाजपने जाहीर केल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.   

धनुष्याला 'हात'भार लावू नका, संजय निरुपम यांचा काँग्रेसला सल्ला 

राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. रविवारी दुसरी कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले.     

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: maharashtra government formation Devendra Fadnavis and other bjp leder meets governor in Raj Bhavan