पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्याला लवकरच पर्यायी सरकार देऊ, पण...

नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण

राज्यातील अस्थिरता संपवण्याकरिता आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये प्रदिर्घ चर्चा झाली. सध्याच्या घडीला चर्चा सुरु असून उद्याही ही चर्चा सुरु राहणार आहे. लवकरच महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा संपेल. आणि राज्याला स्थिर सरकार मिळेल, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. 

राज्यातील सत्तास्थापनेच्या दृष्टिने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी खलबतं सुरु आहेत. दोन्ही पक्षातील अनेक दिग्गजांमध्ये दोन तीन तासांहून अधिक काळ चर्चा सुरु असताना चर्चे दरम्यानच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. तिन्ही पक्ष मिळून स्थिर सरकार देण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचे नवाब मलिक यावेळी म्हणाले. त्यांनी शिवसेनेचे नाव घेतले नसले तरी तीन पक्ष मिळून सरकार स्थापन होईल, असे सांगत त्यांनी शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे संकेत दिले आहेत.   

सोनिया गांधी 'राजी', काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक निर्णायक ठरणार?

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याला सकारात्मक पाऊल उचलल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काय घडामोडी घडणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून होते. बैठक उद्या पुन्हा होणार असल्यामुळे अंतिम निर्णय समोर येण्यासाठी आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार असले तरी सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याचे संकेत मिळत आहेत. 

'उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार'

सत्तास्थापनेचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आघाडीमध्ये चर्चा करु असे दोन्ही पक्षांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. सध्याच्या बैठकीच्या सत्रात शिवसेना फारशी पिक्चरमध्ये दिसलेले नाही. त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा काही निर्णय या बैठकीतून समोर आला तर पुन्हा सत्तास्थापनेचा तिढा बैठकीच्या सिलसिल्यामध्ये अडकून राहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.