पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्तास्थापनेसाठी भाजपकडून सेनेला शुभेच्छा!

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्ता कोण स्थापन करणार? या प्रश्नाचा पहिला अंक समाप्त झाला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याऐवजी सत्ता स्थापन करुन शिवसेनेने आपला मुख्यमंत्री करावा, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र शिवसेना आमच्यासोबत यायला तयार नाही. 

सत्ता स्थापनेसाठी भाजप असमर्थ,चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मोठा पक्ष असूनही  आम्ही सरकार स्थापन करु शकत नाही. आम्हाला जनादेशाचा अनादर करायचा नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी सरकार स्थापन करणार नसल्याची माहिती राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिली आहे. जनतेने दिलेल्या जनादेशचा अनादर करुन शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणार असेल, तर त्यांना खूप खूप शुभेच्छा! असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

धनुष्याला 'हात'भार लावू नका, संजय निरुपम यांचा काँग्रेसला सल्ला

भाजप शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरल्यानंतर राज्याचे लक्ष आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लागून आहे. सरकार स्थापन करायचे असेल तर सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा आवश्यकता आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने विरोधी बाकावर बसण्याची भूमिका यापूर्वी घेतली होती. मात्र भाजप सत्तेपासून दूर गेल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडे शिवसेना जाहीररित्या प्रस्ताव ठेवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.