पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आघाडीवर भरवसा ठेवल्याने शिवसेना अडचणीत

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कौल भाजप-सेना यांच्यासह महायुतीला मिळाला असला तरी भाजप आणि शिवसेना विभक्त झाल्यानंतर चित्र आहे. पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेत असमर्थ असल्याची घोषणा केल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेनेला राज्यपालांसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून असणाऱ्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात अपयशी ठरले. शिवसेनेने राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी तांत्रिकदृष्ट्या त्यांना वेळ वाढवून देण्याबाबत राज्यपालांनी नकार दिला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरु आहे. आघाडीच्या निर्णयावर राज्यातील सत्तास्थापनेची आणि शिवसेनेची गणिते अवलंबून आहेत. आघाडीला चर्चेसाठी अधिक वेळ हवा असल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली असून राज्यपालांनी दिलेली वेळ त्यांना पाळता आलेली नाही.  

 शिवसेनेकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा

'हीच ती वेळ' असे म्हणत निकालाच्या दिवसांपासून सत्तास्थापनेचा तिढा वाढत असतानाही आपल्या भूमिकेवर ठाम राहून शिवसेनेने आपला शब्द खरा ठरवण्याच्या दिशेने पावले टाकली. शिवसेनेने राज्यापालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी वेळ वाढवून दिली नसली तरी दावा फेटाळला नसल्याची  सत्तास्थापने भाजपने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी संपर्क साधत सत्ता समीकरणे जुळवून आणल्य़ाची चर्चा होती. पण राज्यपालांनी दिलेल्या वेळेत हे शक्य झालेले नाही. 

शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र काम करणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतरच्या पत्रकार परिषदेत आम्ही आतापर्यंत खूप समजून घेतले. पण मला माझ्या पक्षाचाही विचार करायला पाहिजे. प्रत्येकवेळी नमते घेणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदावर कोणतही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र भाजपने शिवसेनेच्या मागणीकडे फारसे लक्ष दिले नाही. संजय राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना आपली भूमिका मांडत राहिली तर दुसरीकडे भाजपने सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आपल्या भावना सेनेपर्यंत पोहचवण्याच प्रयत्न केला. यासर्व घडामोडींनतर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. राज्यपालांचे पुढचे पाऊल काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.   

'शिवसेनेवर विश्वास आहे; बाकी सब बकवास है!