पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कामाला नाही मतदानाला जायचं! मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर

राज्यात विधान सभेच्या प्रचाराची धामधूम सुरु झाली आहे. दिवाळीपूर्वीच विजयी उमेदवार फटाके फोडणार हे निश्चित झाले आहे. राज्यभरात २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्य सरकारने २१ ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

'हाता'ला हवी आहे... उर्मिला मातोंडकर याची साथ!

एका परिपत्रकाच्या माध्यमातून राज्य सरकारने ही सुट्टी जाही केली. राज्य आणि केंद्र सरकारची कार्यालय, निम शासकीय कार्यालय, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था या सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज वैध! विरोधकांच्या पदरी निराशा

उल्लेखनिय आहे की, राज्यात २८८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. सत्ता कायम ठेवण्याच्या इराद्याने भाजप-शिवसेना मित्रपक्षांसोबत घेत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी आपपाल्या मतदार संघात मोर्चेबांधणी केली असून राज्यात नवे सरकार येणार की जनता पुन्हा फडणवीस सरकारला साथ देणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Maharashtra Government announces holiday on Maharashtra assembly election 2019 for voting day