पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१३ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या १६ आमदारांवर नजर

शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून सत्तेची गणिते आखली जात असताना सर्वांच्याच नजरा या १३ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या १६ आमदारांवर आहे. हे आमदार २८८ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात बहुमताचा १४५ चा आकडा गाठण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतील. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडीची चर्चा सुरु असलेल्या शिवसेनेने ५६ आमदारांशिवाय सात अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. राज्यात १०५ आमदारांसह सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या १४ इतर आमदारांचे समर्थन असल्याचे म्हटले आहे. अजित पवारांबरोबर किती आमदार आहेत, हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. 

देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात 'वर्षा'वर खलबतं

अचलपूरचे आमदार आणि प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख बच्चू कडून यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले होते. त्यांनी रविवारी 'पीटीआय'शी बोलताना आपल्या दोन आमदारांसह उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यांनी आणखी काही आमदारांना शिवसेनेच्या बाजूला आणले आहे. यामध्ये आशिष जयस्वाल (रामटेक), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), मनिषा गावित (साक्री) आणि चंद्रकांत पाटील (मुक्ताई नगर) यांचा समावेश आहे. 

मी आदरणीय साहेबांसोबतच, संभ्रम निर्माण करु नका

जे आमदार भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यामध्ये आमदार रवी राणा (वडनेरा), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), गीता जैन (मीरा भाईंदर), महेश बाल्दी (उरण), संजय शिंदे (करमाळा), राजेंद्र राऊत (बार्शी), प्रकाश आवाडे (इचलकरंजी) आणि राजेंद्र पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर भाजपने लोहाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, रासपचे रत्नाकर गुट्टे (गंगाखेड), बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे राजेश पाटील, नालासोपाराचे क्षितीज ठाकूर तसेच वसईचे हितेंद्र ठाकूर आणि जनसुराज्य पक्षाचे शाहूवाडीचे आमदार विनायक कोरे यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर विधानसभेत दोन-दोन आमदार एमआयएम आणि सपाचे आहेत. माकपा, मनसे, आरएसपी आणि स्वाभिमानीचे एक-एक आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत.

सुप्रिया सुळेंना या फोटोमधून काय संदेश द्यायचा असेल?