पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली! 'करवीर'नगरीत सर्वाधिक मतदान

ग्रामीण भागात चांगले मतदान पण शहरी भागात निरुत्साह

राज्यातील विधानसभा निकालाच्या मतमोजणीपूर्वी वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोल भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. विरोधक अजूनही परिवर्तनाचा दावा करत आहेत. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीनंतरच  राज्यातील जनतेने कुणाला कौल दिला हे स्पष्ट होईल. मात्र यंदाच्या २८८ जागेसाठी निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याचे पाहायला मिळते.  

महाराष्ट्र

संस्था भाजप-शिवसेना कांग्रेस-राष्ट्रवादी  अन्य
एबीपी-सी व्होटर+ 204 69 15
टाइम्स नाऊ+ 230 48 10
इंडिया टुडे+ 166-194 72-90 22-34

हरियाणा

संस्था भाजप कांग्रेस अन्य
सीएनएन-न्यूज १८ 75 10 5
टाइम्स नाऊ 71 11 8
न्यूजेक्स-पोलस्ट्रॅट 75-80 9-12 1-4

 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहावाजेपर्यंत राज्यात ६०.४६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६३.१३ टक्के मतदान झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मतदार संघात ८० टक्केहून अधिक मतदानाची नोद झाली.  करवीर मतदार संघात सर्वाधिक ८३.२० टक्के, शाहूवाडी ८०.१९ आणि कागलमध्ये ८०.१३ टक्के मतदान झाले. मुंबईतील कुलाबा मतदार संघात सर्वात कमी म्हणजे ४०.२० टक्के तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये ४१.२० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

Maharashtra Exit Polls: पुन्हा महायुतीकडेच सत्तेचा अंदाज

पुण्यातही यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसते आहे. पुणे कॉन्टेंटमेंट बोर्ड, हडपसर, कोथरुड आणि शिवाजी नगर मतदार संघात ५० टक्के मतदानाची नोंदही झालेली नाही. इतर मतदार संघात पन्नाशी पार केली असली तरी मागील विधानसभा निवडणुकीपेक्षाही यंदा कमी मतदान झाल्याचे दिसते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Election Voting Percentage kolhapur district karvir constituency higher voting pune mumbai poor performance