पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी विशेष सोय, 'ॲप'लाही नागरिकांचा प्रतिसाद

विधानसभा मतदानाची प्रतिक्षा (संग्रहित छायाचित्र)

डिजिटायझेशनच्या स्पर्धेत निवडणूक यंत्रणा देखील आता नागरिकांना विविध सेवा एका क्लिकद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी तयार केलेल्या पी डब्लू डी ॲप, सी-व्हिजिल ॲप आणि एनजीआरएस सिटीझन ॲप या तीन ऑनलाईन ॲपना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या "सुलभ निवडणूक" या ध्येयाला समोर ठेवत मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदार संघांत दिव्यांगांसह सर्वच मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे म्हणून मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

अवघ्या २० दिवसांत रविकांत तुपकर पुन्हा 'स्वाभिमानी'त

पी डब्लू डी ॲप

दिव्यांगांना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याकरिता निवडणूक आयोगाचे पर्सन विथ डिसएबिलिटीज  (पीडब्ल्यूडी) हे ऑनलाईन ॲप कार्यान्वित केले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना विधानसभा निवडणुकांसंदर्भात सर्व माहिती मिळण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी पीडब्ल्यूडी ॲपवर नोंदणी करावी. या ॲपद्वारे दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी विशेष सिडी(sidee) व्हेईकल सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी त्यांच्या घरून ने-आण करण्याची सेवा विनामूल्य उपलब्ध आकारवून देण्यात येणार आहे. या ॲपवर दिव्यांग मतदारांकरिता निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती, मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध आहे. पीडब्ल्यूडी ॲपवर मिळणाऱ्या प्रतिसादावरून मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत दिव्यांगांकरिता अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदार संघात एकूण ७,७१९ दिव्यांग मतदार आहेत, तर त्यांच्याकरिता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयाकडून २,०३० स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. या ॲपवर प्राप्त झालेल्या दिव्यांग मतदारांच्या मागणीनुसार आतापर्यंत ९९० व्हील चेअर्सचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांच्या जागी रॅम्प उभारण्याचे देखील नियोजन आहे. तसेच मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना या नागरिकांना घरापासून मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी संबंधित विभागाकडून ५१३ वाहनांची सुविधा करण्यात आली आहे. अधिकाधिक दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेणे आणि त्यांच्यामध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याकरिता मेळाव्यांचे आयोजन देखील या कक्षामार्फत करण्यात आले आहे. दिव्यांग मतदारांच्या सोयीकरिता मतदानाची व्यवस्था तळमजल्यावरच असणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यामार्फत विशेष प्रशिक्षित स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. हे स्वयंसेवक मुंबई लोकल रेल्वेमधील दिव्यांगांच्या डब्याला भेट देऊन दिव्यांग मतदारांकडून त्यांच्या अडीअडचणींविषयी माहिती घेत आहेत व मतदानाविषयी जनजागृतीदेखील करत आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांना सहाय्य करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे.  

'मोदींच्या सभेसाठी वृक्षतोड, या गोष्टीचा बाऊ करण्याची गरज काय?'

सी-व्हिजिल ॲप

निवडणुकीत पारदर्शकता आणण्याच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने मतदारांना थेट सहभागी करून घेत सी-व्हिजिल ॲप विकसित केले आहे. नागरिक आपली ओळख न देता निवडणूक प्रक्रियेतील होत असलेल्या गैरकारभाराबाबत आयोगाला या ॲपद्वारे अवगत करू शकतात. उमेदवार, राजकीय पक्ष किंवा त्यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचारामध्ये कोणत्याही नियमांचे किंवा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास मतदार या ॲपद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात. यामध्ये मतदारांना संबंधित घटनेचे छायाचित्र अथवा व्हिडीओ तक्रारीचा पुरावा म्हणून वापरता येऊ शकते. या ॲपवर प्राप्त तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाते. या ॲपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशभरात वापरले जाणाऱ्या या ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्याकरिता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात एक कक्ष कार्यरत आहे. या कक्षामध्ये सी-व्हिजिल ॲपअंतर्गत आतापर्यंत एकूण ८० तक्रारी प्राप्त झाल्या असून ५७ तक्रारींवर यशस्वीरीत्या कारवाई करण्यात आली आहे. तर २३ तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य आढळून न आल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 एनजीआरएस सिटीझन ॲप

नागरिकांच्या निवडणूक आणि मतदानविषयक कोणत्याही तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय तक्रार निवारण यंत्रणा (एनजीआरएस) हे ॲप कार्यान्वित केले आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयातील या ॲपबाबतचे काम पाहणाऱ्या कक्षाला आतापर्यंत १२,०९० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ११,६३४ तक्रारींमध्ये तथ्य न आढळल्याने त्या बंद करण्यात आल्या. तर एकूण ४२६ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली असून १३ प्रकरणांमध्ये चौकशी सुरु आहे.

..असं बोलण्यापेक्षा मेलेलं बरं: उदयनराजे भोसले

सुलभ निवडणूक ध्येय

निवडणूक आयोगाने यंदाचे वर्षी "सुलभ निवडणूक" हे ध्येय समोर ठेवले आहे. या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघांत दिव्यांगांना, गर्भवती महिला, वरिष्ठ नागरिक यांना मतदान करणे सोयीचे व्हावे म्हणून मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत. सार्वत्रिक विधानसभा  निवडणूक- २०१९ च्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाचा आकडा वाढावा हे उद्दिष्ट समोर ठेवत सदरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा ‍जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदार संघ असून एकूण ७,३९७ मतदान केंद्र आहेत. यापैकी १,९७३ मतदान केंद्र पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असल्याने त्यापैकी १,५०६ मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत तर ४६७ मतदान केंद्रांच्या ठिकाणी उद्वाहनाची सोय असल्याने ही मतदान केंद्र पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरच असणार आहेत.

विराटच्या 'डोन्ट व्हरी बी हॅप्पी' ट्विटनंतर शास्त्री ट्रोल