पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेला धक्का, नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश

नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश

निवडणूक तोंडावर असताना मोठा धक्का राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसला आहे. मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस असलेल्या नितीन नांदगावकर यांनी पक्षला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. कट्टर मनसैनिक आणि राज ठाकरेंचे समर्थक समजल्या जाणाऱ्या  नितीन नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.

पंढरपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने, दोघांनीही जाहीर केले उमेदवार

आपल्या  खळ्ळ खट्याक स्टाईलमुळे नांदगावकर हे नेहमीच चर्चेत असायचे. टॅक्सी, रिक्षा चालकांच्या मुजोरीला मनसेस्टाईल उत्तर देण्यासाठी ते ओळखले जायचे. कट्टर मनसे सैनिक असलेल्या नांदगावकरांचा मनसे प्रवेश हा ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाला मोठा धक्का असल्याची चर्चा होत आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं नांदगावकर म्हणाले. नुकतीच मनसेनं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी देखील जाहीर केली. दोन्ही यादींमध्ये नितीन नांदगावकरांना वगळण्यात आलं होतं, त्यामुळे नाराज झालेल्या नांदगावकरांनी इंजिनाची साथ सोडून शिवबंधन हाती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 

मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ग्रामीण भागावर भर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी देखील नांदगावकरांपाठोपाठ शिवसेनेत प्रवेश केला आहे.