पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात 'वर्षा'वर खलबतं

अजित पवार

राजकीय घडामोडींना एका रात्रीत कलाटणी देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवारांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले. रविवारी दिवसभर अनेक नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासोबत तासाहून अधिक काळ चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयात उद्या (सोमवारी) शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर महत्त्वपूर्ण सुणावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.  

मी आदरणीय साहेबांसोबतच, संभ्रम निर्माण करु नका : धनंजय मुंडे

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याच्या आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात संयुक्तरित्या याचिका दाखल केली आहे.  या याचिकेवर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. रविवारी न्यायालयाने केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नोटीस बजावली होती. याप्रकरणी त्यांना आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. यासंदर्भात फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली असावी असा अंदाज आहे. 

  महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न, 'ऑपरेशन लोटस'ची तयारी?

या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी सत्तास्थापनेसंदर्भातील काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने अजित पवारांची गटनेतेपदावर हकालपट्टी केली असली तरी २७ आमदारांचा गट हा त्यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. सध्याच्या घडीला अजित पवारांकडे संख्याबळ दिसत नाही. कारण अजित पवारांसोबत असलेले बहुतेक आमदार हे सध्याच्या घडीला शरद पवारांसोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.