पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धनुष्याला 'हात'भार लावू नका, संजय निरुपम यांचा काँग्रेसला सल्ला

संजय निरुपम

राज्यातील सत्तास्थापनेमधील तिढा कसा सुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महायुतीतील भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याने राज्याच्या निवडणुकीत बॅकफूटवर असलेल्या काँग्रेस पक्षही चर्चेत आला आहे. आपलाच मुख्यमंत्री या भूमिकेवर भाजपला पुढे वाटचाल करायची झाल्यास शिवसेनेशिवाय पर्याय नाही. 

मुख्यमंत्री पदाच्या पालखीत शिवसैनिकच बसेल : उद्धव ठाकरे

दुसरीकडे भाजपपासून वेगळे होऊन सत्ता स्थापनेचा नवा डाव टाकण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे. काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष असताना काँग्रेस नेता संजय निरुपम यांनी शिवसेनेसोबत जाऊ नये, असे म्हटले आहे. सरकार बनवण्याच्या कसरतीपासून काँग्रेसने दूर रहावे, असा सल्ला त्यांनी आपल्या पक्षाला दिला आहे. 

सत्ता संघर्ष : अंतिम निर्णयाबाबत भाजपने दिली ही वेळ!

शिवसेना-काँग्रेस मिळून स्थिर सरकार महाराष्ट्रात शक्य नाही. काँग्रेसने शिवसेनेला साथ दिली तर भविष्यात काँग्रेसला अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळेच काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.