राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे दिग्गज नेते शुक्रवारी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील १० जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण, पृथ्वाराज चव्हाण या बैठकीला उपस्थित होते.
Delhi: Maharashtra Congress leaders arrive at 10 Janpath to meet Congress Interim President Sonia Gandhi. pic.twitter.com/jnZ9DpbFcM
— ANI (@ANI) November 1, 2019
राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असले तरी भाजप-शिवसेना यांच्यातील तणावानंतर महाराष्ट्रातील राजकारण सध्या एका वेगळ्या वळणावर पोहचले आहे. शिवसेनेने प्रस्ताव ठेवल्यास सत्ता स्थापनेसाठी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हायकमांडशी चर्चा करु अशी प्रतिक्रिया यापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. याबाबत कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. या बैठकीत राज्यातील निवडणुकीचा एकूण आढाव्यासंदर्भात बोलणे झाले. निवडणुकीतील मतांचे विभाजन आणि राज्यातील सध्याची परिस्थिती यावर चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले.