पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना सेक्युलर झाली का? यावर CM उद्धव ठाकरे भडकले

उद्धव ठाकरे

महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये दोन महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा केली. पहिल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडच्या संवर्धनासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय दोन दिवसांत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आघाडी सरकारने निश्चय केल्याचेही त्यांनी सांगितले.

'किल्ले रायगडसाठी २० कोटी मंजूर, बळीराजासाठी २ दिवसांत मोठी घोषणा करु'

पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना शिवसेना सेक्युलर झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच भडकले. सेक्युलर म्हणजे काय? तुम्हीच सांगा असा उलट प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेतलेल्या छगन भुजबळांनी पत्रकांना उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.  

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर फडणवीसांची पहिली टीका

राज्यघटनेत जे लिहिले आहे तेच सेक्युलर आहे. हे सरकार सामान्य जनतेसाठी काम करणार आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. मागील सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषणाबाजीचा पाऊस पाडला. मात्र त्यांना काहीच मिळालेलं नाही. मुख्य सचिवांना वास्तव चित्र काय आहे? यासंदर्भातील आढावा घेण्यास सांगितले आहे. दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सक्षम निर्णय घेऊ, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.